Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शौचालय नसलेल्या घरांवर लागणार लाल स्टिकर्स

शौचालय नसलेल्या घरांवर लागणार लाल स्टिकर्स
शौचालयाचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर केला जावा. यासाठी स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून गावागावात जनजागईती केली जात आहे. आर्थिक परिस्थिती नाजुक असलेल्या कुटुंबीयांना शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते. असे असतानाही या अभियानाला अपेक्षित गती मिळत नसल्याने आता शासनाने ज्यांच्याकडे शौचालय बांधकाम झालेले नाही अशा कुटुंबीयांना घरांवर धोका असे लिहिलेले लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे तर इतर घरांवर वेगवेगळे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. जेणे करून अशी घरे लगेच ओळखता येतील.
 
पूर्वी निर्मल भारत अभियानांच्या माध्यमातून गावे हागणदरारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या माध्यमातून अनेक गावांमध्ये शौचालयाचे प्रमाण शंभर टक्क्यांवर गेले. आता स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शौचालय बांधकामाची मोहीम फारशी गतिमान दिसून येत नाही ही बाब शासनाने लक्षात घेऊन या अभियानाला गती मिळावी म्हणून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक घरावर वेगावेगळी प्रकारची स्टिकर्स लावली जाणार आहेत. 
 
त्याचप्रमाणे ज्या कुटुंबांकडे शौचालय आहे व संबंधीत कुटुंबांकडून त्याचा शंभर टक्के वापर केला जात आहे अशा घरांवर लय भारी असा मजकूर असलेले स्टिकर्स लावले जाणार आहेत. अनेक कुटुंबांकडून शौचालयाचे बांधकाम केले आहे परंतु संबंधितांकडून 50 टक्केही वापर केला जात नाही. अशा कुटुंबीयांच्या घरांवर मोसंबी रंगाचे फिफ्टी फिफ्टी असा मजकूर असलेले स्टिकर्स लावण्यात येणार आहे. 
 
शासनाच्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही अशा कुटुंबांना तालुका पातळीवर व जिल्हा पाळीवरील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी गृहभेटी देऊन त्यांना शौचालय बांधकामाबाबत मार्गदर्शन करून मत ‍परिवर्तन करणार आहेत. स्टिकर्स लावण्याची मोहीम ही 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये चार्ट ठेवण्यात येणार आहेत. या चार्टमध्ये ही माहिती भरण्यात येणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi