Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सहकारमंत्र्यांच्या 'फॅन्सी' कारवर कारवाई

सहकारमंत्र्यांच्या 'फॅन्सी' कारवर कारवाई
सोलापूर , सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 (10:45 IST)
सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या फॉर्च्युनर कारची नंबरप्लेट नियमबाह्य असल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशावरून ती जप्त करून कारचालकास १०० रुपये दंड करण्यात आला.

सहकारमंत्री पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही कारवाई केली. पाटील बार्शीत पोहोचल्यानंतर त्यांनी एमएच-१३ सीएफ ८११० या फॉर्च्युनर कारचा वापर केला. या कारवर फॅन्सी नंबरप्लेट असल्याची ही बाब एकाने निदर्शनास आणून दिली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यापर्यंत ही बाब पोहोचताच त्यांनी या गाडीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मोटार वाहन निरीक्षक अजित ताम्हणकर यांनी संबंधित गाडीचा चालक कोळी यास १०० रुपये दंड करून ती नंबरप्लेटही जप्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi