Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासर्‍याचा सुनेवर अत्याचार

सासर्‍याचा सुनेवर अत्याचार
सोलापूर , शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (10:43 IST)
शेळगी भागातील मित्रनगर परिसरात सासर्‍याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी सासर्‍यासह मुलाला अटक केली आहे. 
 
ऑॅगस्ट 2014 मध्ये मोहोळ तालुक्यातील तरुणीचा विवाह शेळगी भागातील तरुणाशी झाला होता. विवाहाच्या पंधरा दिवसानंतर सासरी सुनेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. तिचा सासरा सुनेकडे वाईट नजरेने पाहू लागला. तो तिला अश्लील भाषेत बोलून तिच्याकडे  शरीरसुखाची मागणी करू लागला. 15 सप्टेंबर 2015 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घरी सून एकटीच असल्याची संधी साधून सासर्‍याने  तिच्यावर अत्याचार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर सून माहेरी निघून गेली. तिने धाडसाने छळ करणार्‍या पती, सासू व सासर्‍याविरुध्द जोडभावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी पती व सासर्‍यास अटक केली आहे. त्यांना न्यायदंडाधिकारी एस. डी. कंकणवाडी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. यात सरकारतर्फे   अँड. अल्पना कुलकर्णी तर आरोपीतर्फे अँड. आर. एच. रिसबूड, चंद्रसेन गाकवाड यांनी काम पाहिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi