Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साहित्य संमेलनाचे होणार थेट प्रक्षेपण

साहित्य संमेलनाचे होणार थेट प्रक्षेपण
पुणे , बुधवार, 10 मार्च 2010 (18:09 IST)
येथील 83 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्‍प्‍यात आली असून संमेलनात होण-या विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण स्क्रीनच्या माध्यमातून शहरभर केले जाणार आहे. यासाठी पुण्यातील दहा चौकांची निवड करण्‍यात आली असून तेथे हे स्क्रीन बसवण्यात येणार आहेत. हे करत असतांना वाहतुकीला अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

शहरातील शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे विद्यापीठ, एस.एन.डी.टी. महाविद्यालय चौक, सिंहगड रस्ता, सहकार नगर आदी ठिकाणांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. तर मुंबईकरांनाही हे संमेलन पाहता यावे यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कजवळ भव्‍य स्क्रीन उभारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi