Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साहित्य संमेलनाच्या यशासाठी पवारांचे लक्ष

साहित्य संमेलनाच्या यशासाठी पवारांचे लक्ष
पुणे , गुरूवार, 29 जानेवारी 2015 (11:50 IST)
पंजाबच्या घुमान येथे होऊ घातलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग बादल 
यांच्याशी संपर्क साधून पवार यांनी चर्चा केली. 
 
संमेलन यशस्वी होण्यासाठी योग्य त्या सुविधा पुरविण्याबाबत शरद पवार यांनी बादल यांच्याशी चर्चा केली. संमेलनासाठी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या दोन रेल्वेंसाठी सवलतीच्या दरात तिकिट विक्री व्हावी, अशी मागणी आयोजकांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi