Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साहित्य संमेलनाला पिंपरीमध्ये आज सुरुवात

साहित्य संमेलनाला पिंपरीमध्ये आज सुरुवात
, शुक्रवार, 15 जानेवारी 2016 (10:20 IST)
पुणे- चारदिवसीय 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पिंपरीमध्ये आजपासून सुरुवात होत आहे. संमेलानातील कार्यक्रमाची भाऊगर्दी पाहता साहित्य संमेलनाच्या चार दिवसात रसिकांना भरभरून साहित्याचा आनंद घेता येणार आहे. 
 
संयोजकांनी आयोजन करताना रसिकांच्या बौद्धिक भुकेप्रमाणेच त्यांना विविध राज्यातील चविष्ट, रुचकर खाद्य पदार्थाचा मनापासून आस्वाद घेता यावा यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रीयन, गुजराथी, दाक्षिणात्य, राजस्थानी पदार्थाचा समावेश असणार आहे.
 
तोंडाला पाणी सुटेल अशा विविध प्रकारच्या महाराष्ट्रीय मेजवानीबरोबरच गुजराती, राजस्थानी आणि दक्षिणी पदार्थाची लज्जत साहित्य संमेलनात सहभागी साहित्यिक आणि रसिकांना चाखता येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi