Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीएसटी ते कुर्ला सहा तासांचा "ब्लॉक"

सीएसटी ते कुर्ला सहा तासांचा
मुंबई , शनिवार, 28 मे 2016 (12:20 IST)
कुर्ल्यातील कसाईवाडा पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम केले जाणार असून, पुलाच्या कामासाठी २८ मेच्या मध्यरात्री सव्वा बारा वाजल्यापासून सीएसटी ते कुर्ला स्थानकांदरम्यान सर्व मार्गांवर सहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकदरम्यान मेन लाइनवरील २४ लोकल फेऱ्या तर हार्बरवरील २८ फेऱ्या आणि काही मेल-एक्स्प्रेसही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सीएसटीहून कर्जतसाठी शेवटची लोकल रात्री साडे अकरा वाजता सोडण्यात येईल, तर रात्री साडे अकरानंतर सीएसटी मेन लाइनवरून सुटणाऱ्या सर्व लोकल या कुर्ला स्थानकातून सोडण्यात येतील. हार्बर सीएसटीहून वाशीसाठी शेवटची लोकल रात्री ११.३८ वाजता सोडण्यात येणार आहे. त्यानंतर सीएसटीहून सुटणाऱ्या हार्बरच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेचा नरेंद्र मोदींना टोला