Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सी लिंकवरुन उडी घेवून एकाची आत्महत्या

सी लिंकवरुन उडी घेवून एकाची आत्महत्या
मुंबई , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (17:33 IST)
वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन उडी घेऊन एका वृद्ध व्यक्तीने मंगळवारी आत्महत्या केली. लालसिंह राजपूत (70) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.  
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माझगाव येथे ऑफिसमध्ये जाण्यासाठी कारने निघालेल्या लालसिंह राजपूत यांनी चालकाला कार सी लिंकच्या दिशेने वळवण्यास सांगितले. कार सी लिंकच्या मध्यभागी आल्यानंतर त्यांनी कार थांबवण्यास सांगितले. कार थांबताच त्यांनी कारमधून खाली उतरून चालकाला काही कळण्याच्या आतच समुद्रात उडी घेतली. घटनेनंतर चालकाने पोलिस आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. 
 
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी राजपूत यांचा मृतदेह बाहेर काढला. राजपूत हे गेल्या तीन दशकांपासून डिप्रेशनमध्ये होते. यातच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi