Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुरेशदादा जैन यांच्या प्रकृतीसाठी जळगावकरांनी केली प्रार्थना

सुरेशदादा जैन यांच्या प्रकृतीसाठी  जळगावकरांनी केली प्रार्थना
, शुक्रवार, 13 जून 2014 (15:56 IST)
1) सुरेशदादा आणि इतरांसाठी साकडे घालण्यासाठी सर्वधर्मियांची बैठक
2) भावनेने ओथंबलेल्या या प्रार्थनासभेला हजारो लोकांनी केली गर्दी

विविध धर्माच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हजारो जळगावकारांनी 27 महिन्यापांसून तुरूंगात असलेले आणि आरोग्यासंबंधीच्या अनेक संकटांना सामोरे जाणारे लोकनेते सुरेशदादा जैन यांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम प्रकृतीसाठी मंत्रजपाच्या घोषात प्रार्थना केली.

सामूदायिक सदभावना प्राथना या सभेला हिंदु, बौध्द, मुस्लीम, सिख, पारसी, ख्रिश्चन आणि जैन अशा सर्व धर्मियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

तुरूंगात असलेले श्री जैन अणि त्यांच्यासह नाना वाणि, राजा मयूर आणि प्रदीप रायसोनी यांचेही आरोग्य चांगले राहावे त्यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी या सर्वधर्मियांच्या प्रमुखांनी प्राथना केली.

1200 जण बसू शकतील अशी क्षमता असलेल्या कांताई सभागृहात ही प्रार्थनासभा झाली. सभेवेळी ह सभागृह खचाखच भरलेला होता. तसेच श्री सुरेशदादा जैन यांना मानणारे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ते सर्व जण सभागृहबाहेर लावलेल्या टेलिव्हिजन स्क्रिनवर ही प्राथनासभा पाहात होते.
सुरेशदादा जैन मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या प्राथनासभेला जळगावमधील हजारो दिग्गज उपस्थित होते.

सुरेशदादा जैन मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या प्रार्थनासभेला जळगावमधील हजारो दिग्गज उपस्थित होते. यावेळी विविध धर्मांच्या प्रमुखांनी श्री सुरेशदादा जैन यांनी जळगावच्या विकासाठी आणि कल्यासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांनी हाती घेतलेले समाजकार्य परत जोमाने सुरू होण्यासाठी ते लवकर परत यावेत यासाठी प्रार्थनाही केली.

विविध धर्मियांचे प्रमुख यावेळी म्हणाले की, "श्री सुरेशदादा जैन यांनी केवळ या शहरासाठीच काम केलेले नाही तर गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्राची सेवा केली आहे. त्यांच्यासाठी ही प्राथनासभा आयोजित करण्यात आली आहे. आम्हाला खात्री आहे की आमचे नेते श्री जैन हे निरपराध आहेत. ते सध्या 71 वर्षांचे आहेत आणि त्यांनी गेल्या 27 महिन्यांपासून तरूंगात खूप काही भोगले आहे. आमची इश्वरचरणी प्राथना आहे की श्री जैन आणि त्यांच्यासोबत असलेल्यांची आरोग्य उत्तम राहावे आणि देवाने त्यांना तेथे राहण्याची शक्ती द्यावी. आमचा आपल्या न्यायव्यवस्थेवर गाढा विश्वास आहे आणि आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळाव, अशी आमची इच्छा आहे."

आयोजन समिती म्हणाली की, "या प्रार्थना सभेला लोक हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले त्याचा आम्हाला आनंद आहे. श्री सुरेशदादा जैन यांनी कोणतेही गैर केलेले नाही हे या प्रार्थनासभेतून पुन्हा दिसून आले. 71 वर्षांच्या श्री सुरेशदादा जैन यांच्यावर तुरूंगात असतानात बायपास सर्जरी झाली. त्यांना आरोग्याच्या अनेक समख्यांना सामोरे जावे लागत आहे आणि दिर्घ काळापासूनच्या तुरूंगवासामुळे त्यांना मानसिक त्रासही होतो आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की श्री सुरेशदादा जैन या संकटातून बाहेर पडतील."

"इतनी शक्ती हमें देना दाता...." या भजनाने या प्रार्थनासभेची समाप्ती झाली.
श्री जैन हे गेल्या 27 महिन्यांपासून तुरूंगात आहेत. त्यांना तेथे आरोग्यविषयक समख्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून, गेल्या अनेक महिन्यापासून तुरूंगात असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी परिणाम होत आहे.

तुरूंगात असताना त्यांच्यावर अत्यंत अवघड अशी बायपास सर्जनी करण्यात आली. या सर्जरीनंतर त्यांना अनेक समस्या उद्भवल्या. त्यांना इस्केमिक हार्ट डिसिज (आयएचडी). युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन (यूआयटी), इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेक्स, इर्रिटेबल बोवेल डिसिज (आयबीडी), प्रोलॅप्सड डिस्क, बेनाइन एंलार्जड प्रोस्टेट (बीइपी), पेल्व्हिक इंफ्लेमेटरी डिसिज (पीआयडी) अशा आजारांना सामोरे जावे लागले.

त्यांना मधूमेह आहे आणि रक्तदाबाचाही त्रास आहे. गेल्या दोन वर्षांत अनेकदा त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. नुकतेच त्यांना इंटेंस्टिनल ऑबस्ट्रक्शन  झाल्याचे आढळले असून, त्यांच्या पोटात अल्सर झाल्याचेही निदान झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi