Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेना-भाजपमुळे राणेंना कणकवलीत ‘दे धक्का’

सेना-भाजपमुळे राणेंना कणकवलीत ‘दे धक्का’
कणकवली , शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (10:44 IST)
काँग्रेसमधील बंडखोर संदेश पारकर यांच्या गटाने कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांना ‘दे धक्का’ दिला आहे. नगराध्यक्षपदी पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांची निवड झाली.
 
कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर संदेश पारकर गटाने अर्ज दाखल केले होते.  शिवसेना - भाजपाच्या नगरसेवकांची साथ मिळाल्याने पारकर गटाच्या माधुरा गायकवाड यांनी काँग्रेसच्या सुविधा साटम यांचा पराभव केला. पारकर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी नारायण राणेंना आव्हान दिले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi