Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनियांचे सरसकट कर्जमाफीचे संकेत

सोनियांचे सरसकट कर्जमाफीचे संकेत
उस्मानाबाद , मंगळवार, 18 मार्च 2008 (10:39 IST)
देशातील शेतकर्‍यांचे दुःख पाहून सतत दुःख जाणवायचे. गरीब व कष्टाळू शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची गरज होती. त्या दृष्टीने कर्जमुक्तीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे चार कोटी शेतकर्‍यांना नवजीवन मिळाल्याचे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. तथापि, सरसकट कर्जमाफीसाठी योग्य ती पावले उचलण्याची सुचना केंद्रातील युपीए सरकारला करणार असल्याचे सांगून सोनियांनी सरसकट कर्जमाफीचे संकेतही दिले.
उस्मानाबादमध्ये शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीनंतर सोनिया गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येणार होत्या त्यामुळे उस्मानाबाद येथील शेतकरी मेळाव्यात कर्जमाफीच्या अनुषंगाने त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कर्ज माफीमुळे देशातील ४ करोड शेतकरी व त्यांच्या कुटूंबीयांना नवजीवन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. देशातील शेतकरी दुःखी असून त्याचे हे दुःख आपल्याला सातत्याने जाणवत होते. काँग्रेस सरकार नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत आले आहेत. कर्जमाफी हा त्यापैकी एक निर्णय असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले.
देशातील शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची आवश्यक असल्याचे स्पष्ट करून श्रीमती गांधी म्हणाल्या की, देशात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या समस्या आहेत. विदर्भ मराठवाडा सारख्या भागातील कृषी क्षेत्र, त्याच्या गरजा व समस्या लक्षात घेता अशा प्रांतातील शेतकर्‍यांना आर्थिक बळकीची आवश्यकता आहे. यासाठी आपण केंद्र सरकारला योग्य ते पाऊल उचलण्याची सुचना करणार असल्याचे श्रीमती गांधी यांनी सांगितले.

मराठवाडा व विदर्भ दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या भागात शेतकर्‍यांना सर्रास ५ एकर पेक्षा अधिक जमीन असल्याने कर्जमाफीच्या या निर्णयाचा फायदा या भागातील शेतकर्‍यांना तेवढा प्रमाणात झाला नाही त्यामुळे ५ एकरपेक्षा अधिक शेती असलेल्या शेतकर्‍यांनाही कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या भाषणात सोनिया गांधी यांच्याकडे केली.
विलासराव सरकारवर सोनियांची स्तुती सुमने
देशात काँग्रेसची सरकारे मोठा प्रमाणात विकास कामे करत आहेत.महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकार काँग्रेसची विकासाची परंपरा पाळत आहे. राज्यात विविध विकास योजना यशस्वीपणे राबविल्या जात असल्याचे सांगून सोनिया गांधी यांनी विलासराव देशमुख सरकारवर स्तुती सुमने उधळली.

राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
मुंबई येथील परप्रांतीयांचा वाद शमला असतनाच देशात प्रत्येक व्यक्तील कोठेही वास्तव्य, व्यवसाय करता येईल असे वक्तव्य करून सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला त्यांचे नाव न घेता विरोध दर्शवून टीका केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi