Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोलापूर विमानसेवा : एअर इंडिया अनुकूल

सोलापूर विमानसेवा : एअर इंडिया अनुकूल
सोलापूर , गुरूवार, 2 एप्रिल 2015 (10:32 IST)
गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेली सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर सोशल फोरमने पुढाकार घेतला आहे. बुधवारी लोटस हॉटेल येथे झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांच्या बैठकीत एअर इंडियाच्या अधिकार्‍यांनी सोलापूरला विमानसेवा सुरू करण्यासाठी अनुकूलता दाखविली. बैठकीचा सकारात्मक अहवाल एअर इंडियाच्या वरिष्ठांना देण्यात येणार असून त्यानंतर ग्रीन सिग्नल मिळताच 68 प्रवासी क्षमतेची विमानसेवा सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे एअर इंडियाचे पश्चिम भारताचे विक्री अधिकारी अजित सलगरे यांनी सांगितले.
 
एअर  इंडियाचे अधिकारी सलगरे आणि वाणिज्य विभागाचे अधिकारी पल्लव परालकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्स, बिल्डर्स असोसिएशन्स, यंत्रमागधारक संघ, इलेक्ट्रानिक्स डिलर्स असोसिएशन, चार्टर्ड अकौंटंट, हॉटेल, शैक्षणिक, एनटीपीसी तसेच शहरातील उद्योजक उपस्थित होते.
 
प्रारंभी फोरमचे सदस्य पराग शहा यांनी शहर व जिल्ह्यातील हॉटेल्स, साखर कारखाने, धार्मिक पर्यटन तसेच व्यापार व उद्योगांची माहिती देऊन विमानसेवेची सोलापूरला का गरज आहे, हे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi