Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हार्दिक करणार मराठा आरक्षणाचा एल्गार?

हार्दिक करणार मराठा आरक्षणाचा एल्गार?
पुणे , बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (11:31 IST)
पटेल समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेलने सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दिकसोबत एकत्र लढा उभा करू, अशी माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली.

ते म्हणाले, गुजरातमध्ये पटेल समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी हार्दिक यांची मागणी आहे. महाराष्ट्रात मराठा सेवा संघाचीही मराठा समाजाबाबत अशीच मागणी आहे, असे खेडेकर यांनी सांगितले. हार्दिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही खेडेकर यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi