Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात पावसाचा ‘कडाका’

हिवाळ्यात पावसाचा ‘कडाका’
पुणे , सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (11:14 IST)
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने पुणेकरांना गेल्या २४ तासांपासून झोडपून काढले आहे.  रविवारी दुपारी सुरु झालेल्या पावसाने आज (सोमवार) पहाटेपर्यंत उसंत घेतलेली नव्हती. यामुळे चौकाचौकात तळी साचली असून आठवड्याच्या सुरुवातीलाच पुणेकरांची दैना उडाली आहे.

रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पुणेकरांना स्वेटरऐवजी छत्र्या आणि रेनकोट घालून घराबाहेर पडावे लागले. दुपारी म्हणजे, साधारणत: साडेबारा वाजल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये हलक्या पावसाला सुरवात झाली. सोमवारी पहाटेपर्यंत पावसाने चांगलाच जोर धरला होता. दरम्यान, मुसळधार पावसामुळे घरांच्या भिंती आणि झाडांची पडझड झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या दोन- तीन दिवसांमध्ये शहरात किमान तापमान 12.9 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले. शहरातील सिंहगड रस्ता, कात्रज, पुणे- सातारा रस्ता, कोथरूड, औंध, खडकी, आंबेगाव, धायरी, वारजे, डेक्कन, शिवाजीनगर, येरवडा, सांगवी, पिंपळे सौदागर, कासारवाडीतही रात्रभर पाऊस पडत होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi