Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

३१ जुलै मुंबई दिन म्हणून साजरा करुया

३१ जुलै मुंबई दिन म्हणून साजरा करुया
, गुरूवार, 30 जुलै 2015 (12:16 IST)
दिनांक ३१ जुलै हा जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांचा स्मृतिदिन
मुंबईच्या सन्माननीय शिल्पकारांपैकी एक श्री नाना शंकरशेठ! आपला पैसा आणि मालकीची जमीनही सढळहस्ते त्यांनी मुंबईला दान केली. मुंबई हे केवळ एक शहर नाही. ते एक स्पिरीट आहे. मुंबईकर हि एक अभिमानास्पद ओळख आहे. ही ओळख घडवण्यात ज्या महान व्यक्तीने आपले योगदान दिले तिला विसरणे कृतघ्नपणाचे ठरेल. म्हणूनच हा दिवस प्रबोधक मुंबई दिवस म्हणून साजरा करणार आहे.

सर्व मुंबैकरांनी या दिवशी हा दिवस साजरा करावा असे आवाहन प्रबोधक करीत आहे.
१) एकमेकांना शुभेच्छा द्या.
२) मुंबईचा आपल्याला अभिमान आहेच. या दिवशी आपण मुंबईकर असल्याबद्दल नितांत अभिमान बाळगा.
३) मुंबई स्वच्छ ठेवा. जाणीवपूर्वक अजिबात कचरा करू नका, कोणाला करू देऊ नका. शक्य झाल्यास स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा.
४) मुंबईतील महत्वाच्या स्थळांपैकी तुमच्या जवळच्या कुठल्याही एका स्थळाला (वाचनालय, मुंबई रेल्वे ऑफिस, पुतळे, हुतात्मा चौक इ.) सदिच्छा भेट द्या.
५) मुंबईमधील तुमच्या ओळखीच्या मोठ्या व्यक्तींना, लोकल मोटरमन, पोलिस यांना भेट द्या, सदिच्छा द्या!


मुंबई दिवस हा आपला दिवस आहे. कित्येक संकटानंतरही जोमाने उभे राहणाऱ्या, सतत धावते असणार्या, आणि घाईतही आपले हृदय आणि भावना जागरूक ठेवणाऱ्या मुंबईला सल्लाम करण्याचा हा दिवस!

या साजरा करूया आपल्या मुंबईचा मुंबई दिन!

Share this Story:

Follow Webdunia marathi