Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘तो’ बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण इंटरनेटवरुन

‘तो’ बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण इंटरनेटवरुन
नाशिक , सोमवार, 2 मार्च 2015 (13:39 IST)
बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात कुरिअरने पाठविलेला गावठी बॉम्ब अल्पवयीन मुलाने इंटरनेटवर माहिती घेऊन बनविला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, बांधकाम व्यावसायिकास धमकावून खंडणी उकळण्याचा या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा डाव होता. या प्रकरणी सबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.

महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोरील सुयोजित हाईटमध्ये अनंत राजेगावकर या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात कुरिअरने गावठी बॉम्ब दाखल झाला होता. बॉम्बशोधक व नाशक पथकाने तो निकामी केला होता. दरम्यान, दूरध्वनी क्रमांकावरुन हे कृत्य महाविद्यालयीन अल्पवयीन मुलाने केल्याचे स्पष्ट झाले. संशयित मुलाला ताब्यात घेण्यात आले. पैसे मिळविण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़. 

Share this Story:

Follow Webdunia marathi