Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मनसे'ने दाखवला एनटीसीस 'मराठी बाणा'

'मनसे'ने दाखवला एनटीसीस 'मराठी बाणा'

एएनआय

मुंबई , रविवार, 30 मार्च 2008 (18:09 IST)
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'मराठी बाण्यासाठीचा' संघर्ष कायम राखत राष्ट्रीय वस्‍त्रउद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मराठी चित्रपटगृह पाडून जमिनीचा विकास करण्याच्या कृतिवरूद्ध निदर्शने केली. येथील भारतमाता चित्रपटगृहात फक्त मराठी चित्रपटच दाखवण्यात येतात.

हे चित्रपटगृह पाडण्यात आल्यास नवीन चित्रपटगृह बांधण्याची मागणी मनसेने लावून धरली आहे. यामागे मराठी चित्रपटगृहाचे जतन करण्याचा उद्देश आहे. मराठी चित्रपटगृह न उघडल्यास विरोध प्रदर्शन कायम राहणार असल्याचे 'मनसे' सचिव प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

भारतमाता चित्रपटात प्रेक्षकांना परवडणार्‍या वीस रूपयांच्या तिकिटात चित्रपट दाखवण्यात येतात व फक्त मराठी चित्रपट दाखवणारे शहरातील ते एकमेव चित्रपटगृह असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी मनसेच्या आठशे कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi