Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'लोकमत'च्‍या इमारतीत आग

'लोकमत'च्‍या इमारतीत आग

भाषा

नागपूर , शनिवार, 9 ऑगस्ट 2008 (12:59 IST)
नागपूर- 'लोकमत' या दैनिकाच्‍या नागपूर येथील इमारतीतील 12 व्‍या मजल्‍यावर दि.8 रोजी रात्री मध्‍यरात्री अचानक आग लागली. या आगीत लोकमत कार्यालयातील फर्निचरसह अनेक साहित्‍य जळून खाक झाले. सुदैवाने आग आटोक्‍यात आणण्‍यात अग्निशमन दलाला यश आल्‍याने जीवीत हानी झाली नाही.

शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक आग लागली त्‍यावेळी वृत्‍तपत्राच्‍या इमारतीत कार्यालयीन कामात व्‍यस्‍त अनेक कर्मचारी होते. आग लागल्‍यानंतर अग्‍िनशमन दलाने आग आटोक्‍यात आणण्‍यासोबतच इमारतीत अडकलेल्‍या काही लोकांना त्‍वरित बाहेर काढले.

या इमारतीत लोकमतच्‍या दोन प्रकाशनाच्‍या संपादकीय व प्रशासकीय कार्यालय इतरही अनेक कार्यालये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi