Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सॅन फ्रॅन्सिस्कोला' मराठी साहित्य संमेलन!

'सॅन फ्रॅन्सिस्कोला' मराठी साहित्य संमेलन!
औरंगाबाद , सोमवार, 26 मे 2008 (08:07 IST)
सॅन फ्रॅन्सिस्को येथील बेएरिया महाराष्‍ट्र मंडळाने 82 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचे निमंत्रण दिले असून साहित्य मंडळाच्या बैठकीत संमेलन स्थळ निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

रत्नागिरी, ठाणे आणि सॅन फ्रॅन्सिस्को या तीन ठिकाणांपैकी एका ठिकाणीची निवड येत्या पंधरा दिवसात करायची आहे. यामुळे काही सदस्य संभ्रमात पडले असून अशाच प्रकारची मागणी काही वर्षापूर्वी मधुकर आष्टीकर यांनी मराठक्ष साहित्य संमेलन लंडनला घेऊन जाण्याचा प्रस्ताव मांडला होता. साता समुद्रापार मराठीचा झेंडा फडकाविण्यासाठी सॅन फ्रॅन्सिस्कोने निमंत्रण दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi