Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा : मंत्रिमंडळ बैठकीत 10 महत्वाचे निर्णय

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा : मंत्रिमंडळ बैठकीत 10 महत्वाचे निर्णय
, गुरूवार, 4 जानेवारी 2024 (20:44 IST)
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
 
यावेळी  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल निश्चित करण्यात आलाय. त्याशिवाय दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याशिवाय इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आलाय.  
 
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील  10 महत्वाचे निर्णय :
 
* नोव्हें २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा ( वित्त विभाग)
* अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये ( नगरविकास विभाग )
*  दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.  ( दुग्धव्यवसाय विकास)
* विदर्भातील  सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार ( जलसंपदा विभाग)
* मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.  ( वित्त विभाग)
* पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान . ४०० उद्योगांना फायदा  ( वस्त्रोद्योग)
* रेशीम उद्योगाच्या विकासासाठी " सिल्क समग्र २" योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ  ( वस्त्रोद्योग विभाग)
* द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार ( उद्योग विभाग)
* नांदेड - बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता ( परिवहन विभाग)
* सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला( सहकार विभाग)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2005 पूर्वी रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, ओल्ड आणि न्यू पेन्शन स्कीम वाद नेमका काय आहे?