राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त (World Menstrual Hygiene Day 2022)मोठी घोषणा करण्यात आली. राज्यातील 60 लाख महिलांना नाममात्र 1रुपयात 10 सॅनिटरी नॅपकिन/ सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) देण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील महिला आणि महिला (Women)बचत गटाच्या महिलांना होणार आहे. येत्या 15ऑगस्टपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. महिला बचत गट आणि रेशनिंग दुकानाच्या माध्यमातून या नॅपकिनचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वापरलेले पॅड् नष्ट करण्यासाठी गावागावात मशीन्स बसवण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 200कोटी रुपये खर्च शासन करणार आहे. आज 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस' आहे. यानिमित्ताने ग्रामविकास मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
या दिवसाबद्दल -
28 मे 2014 मध्ये वॉश युनायटेड ऑफ जर्मनी या एनजीओने मासिक पाळी स्वच्छता दिवस पहिल्यांदा साजरा केला. महिलांचे (Womens)मासिक पाळीचे चक्राचा कालावधी हा 28 दिवसांचा असतो. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी 28 तारीख निवडण्यात आली.