Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा फक्त ऑफलाइनच होतील, कोणताही बदल होणार नाही - सूत्र

राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा फक्त ऑफलाइनच होतील, कोणताही बदल होणार नाही - सूत्र
, बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (23:21 IST)
राज्यात 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जातील. वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच निश्चित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतल्या जातील. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या मंगळवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि परीक्षेच्या तारखा वाढविण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते . यानंतर प्रश्न निर्माण झाला की परीक्षांशी संबंधित नियमांमध्ये काही बदल होणार का? तर याचे उत्तर नाही असे आहे. परीक्षा पूर्वनियोजित पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.
 
दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाइन होत आहे. अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. खूप नुकसान झाले आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे कारण नाही. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असून ती वेळेवरच घेतली जाणार आहे.
राज्यभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी बोर्डाकडे यंत्रणा नाही. सोमवारी वर्षा गायकवाड यांनी आंदोलनादरम्यानही असे सांगितले होते.त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात भौगोलिकदृष्ट्या खूप फरक आहे. दूरवरच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षेची व्यवस्था करणे शक्य नाही. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लखनौच्या आयपीएल संघाचा अधिकृत लोगो समोर आला