Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक कोटींच्या गुटख्यात 11 आरोपी; 10 गजाआड !

jail
अहमदनगर , गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (22:00 IST)
कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी 11 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 272, 273, 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
10 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक कोटी एक लाख 56 हजार 720 रूपये किंमतीचा गुटखा, विविध कंपन्यांचे मोबाईल, चार दुचाकी व रोख रक्कम असा एकुण एक कोटी सहा लाख 23 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
 
याप्रकरणी राकेशकुमार जगदंबाप्रसाद मिश्रा (वय 42 रा. एमआयडीसी, नगर), अभिजित गोविंद लाटे (वय 34 रा. पाईपलाईन रोड, नगर), राहुल कैलासनाथ सिंग (वय 24 रा. दसगर पारा ता. कादीपुर जि. सुलतानपुर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. बोल्हेगाव, नगर), अझर शकील शेख (वय 31 दावल मलिक चौक, बोल्हेगाव),
 
चंद्रकेश शोभनाथ तिवारी (वय 50), शिवप्रकाश रामकुमार तिवारी (वय 48 दोघे रा. पाडीच डिहीया ता. शाहगंज जि. जोनपुर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. बोल्हेगाव), मोहसिन शब्बीर पटेल (वय 36 रा. नवनाथनगर, बोल्हेगाव), अर्जुन शंकर यादव (वय 46 रा. वरळी कोळी वाडा,
वारसलेन, मुंबई, हल्ली रा. बोल्हेगाव), नितीन सुनील साठे (वय 32 रा. सनफार्मा शाळेजवळ, बोल्हेगाव), शादाब शब्बीर पटेल (वय 29 रा. नवनाथनगर, बोल्हेगाव), गोडाऊन मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे (पसार) अशी आरोपींची नावे आहेत.
दुचाकीवरून दोघे जण गुटखा विक्री करण्यासाठी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.निरीक्षक शिंदे यांच्यासह उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, सागर पालवे,राजु शेख, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, दीपक साबळे, सतिष भांड, राहुल गवळी, संदीप थोरात, राहुल गुंडू यांच्या पथकाने सुरूवातीला राकेशकुमार मिश्रा व अभिजित लाटे यांना पकडले.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बोल्हेगाव शिवारातील गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये एक कोटीचा तीन ट्रक गुटखा मिळून आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फळांचा राजा आंबा हापूस’ आला रे…मुहूर्ताचा दर ४ हजार दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर