Publish Date: Fri, 22 Mar 2019 (08:15 IST)
Updated Date: Fri, 22 Mar 2019 (08:16 IST)
मुंबईत धुळवड साजरी करताना १२ जण जखमी झालेत. यामध्ये थंडाईतून दोघांना विषबाधा झाली आहे. तसेच होळी खेळताना पडून जखमी झालेल्या रुग्णांवरही उपचार सुरु आहेत.
धुळवडीच्या दिवशी रासायनिक रंगाचा वापर करू नका फुग्यांचा वापर करू नका, असे पोलीस प्रशासनाकडून तसेच इतर सामाजिक संस्थांकडून वारंवार सांगून देखील अनेकांनी याकडे कानाडोळा केल्याचं दिसत आहे. धुळवडीचा सण साजरा करताना जखमी झालेल्या १२ रुग्णांना पूर्व मुंबई उपनगरातल्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात फुगा लागून एकजण जखमी झाला. तर थंडाईतून दोघांना विषबाधा झाली आहे. तसेच होळी खेळताना पडून जखमी झालेल्या रुग्णांवरही उपचार सुरु आहेत.