महाराष्ट्रातील कल्याण येथे एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली आहे मुलीने पोलिसांना सांगितले की वर्षभरापूर्वी देखील आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेनन्तर मुलगी घाबरली असून तिच्यावर समुपदेशन केले जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी दुकानावर केक खरेदी करण्यासाठी गेलेली असता आरोपीने मागून येऊन तिचे तोंड दाबून तिला जवळच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला नंतर तिला सोडून पळून गेला अकदास चंदू असे आरोपीचे नाव असून तो पीडित मुलीच्या परिसरातील रहिवासी आहे.आरोपी खाद्य पदार्थ विक्रेता आहे.वर्षभरापूर्वी देखील आरोपीने मुलीवर अत्याचार केले होते.
मुलीने तिच्या पालकांना या घटनेची माहिती दिली असून आरोपीच्या विरोधात पोलीस तक्रार केली असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्हापासून मुलांचे संरक्षण पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला . शनिवारी आरोपीला अटक करण्यात आली.