Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संतापजनक: तेरा हजार महिलांचे गर्भाशय काढून टाकले

webdunia
समाजाला मान खाली घालवणारी घटना बीड येथे घडली आहे. घरातील लक्ष्मीला कश्या प्रकारे हीन वागणूक दिली जाते याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्याची काळजी घेतली नसल्याने बीड जिल्ह्यात हजारो महिलांना गर्भपिशवीच्या (hysterectomies in beed) कर्करोगाचा आजार झाला होता,  यावर शस्त्रक्रिया करून त्यावर निदान करण्यापेक्षा जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क गर्भ पिशवीच काढून टाकण्याचा धंदा सुरू केला.

तब्बल 13 हजार महिलांचे गर्भाशय (hysterectomies in beed) काढून फेकण्यात आल्याचा एक अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे समाजात किती पराकोटीचे फसवनूक आणि महिलांचे हाल सुरु आहेत हे उघड होते आहे. 
 
मासिक पाळी वेळेवर न होणे, पांढरा पदर जाणे, मासिक पाळी दरम्यान कपडा वापरणे, शिवाय उघड्यावर शौचास बसल्यानंतर उठबस करणे यामुळे पिशवीचे कर्करोगाचे आजार जडतात. यातच या अनेक महिला मजूर असल्याने कामाच्या ताणातून असे आजार होत असल्याचं उघड होत आहे.गर्भातच मुलीची हत्या करणारा जिल्हा म्हणून या बीडची संपूर्ण देशात बदनामी झाली होती. स्त्री भ्रूण हत्तेची राजधानी म्हणून या बीडची ओळख होती, मात्र या घटनेमुळे पुन्हा बीड चर्चेत आले असून महिलांना येथे मान सन्मान नाहीच असे उडत होत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

Facebook आणत आहे नवीन अॅप, स्नॅपचँटशी होईल मुकाबला