Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 14 January 2025
webdunia

विजेच्या धक्क्याने 13 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

shock
, रविवार, 17 एप्रिल 2022 (15:36 IST)
जळगावच्या ममुराबाद येथे एका लग्न घरात आनंदाच्या वातावरणात शोककळा पसरली. येथे ममुराबाद येथील एका 13 वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाला. प्रणव पाटील असे या मृत्युमुखी झालेल्या मुलाचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद पाटील हे ममुराबाद जिल्हा जळगाव येथे आपल्या पत्नी दीपाली आणि तीन मुलांसह राहतात. मुकुंदाचे थोरले बंधू दिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे रविवारी सकाळी मुकुंद आपल्या पत्नीसह आपल्या भावाच्या घरी गेले होते. घरात प्रणव एकटा होता.सकाळी बाथरूममध्ये अंघोळीसाठी बादलीत पाण्याचे रॉड(हिटर) लावले होते.

बाजूला प्रणव अंघोळ करण्यासाठी बसला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान लग्नासाठी आलेले रवींद्र पाटील हे घरी आले आणि त्यांनी प्रणवला बाथरूम मध्ये पडलेले पहिले. त्यांनी तातडीने सर्व नातेवाईकांना बोलावून घेतले आणि प्रणव ला  तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांनी त्याला मृत घोषित केले. हे पाहतातच आई वडिलांनी हंबरडा फोडला. मयत प्रणवचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे. प्रणवच्या मृत्यूने लग्नघरात शोककळा पसरली आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खासदार अमोल कोल्हेने वरातीत वाद्याच्या ठेक्यावर डान्स केला