Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाणे-दिवा डाऊन मार्गावर 14 तासांचा ब्लॉक; ‘गाड्या रद्द

local train mumbai
, बुधवार, 19 जानेवारी 2022 (21:46 IST)
मध्य रेल्वे ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉकसह अप जलद मार्गावर 2 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नेमक्या कोणत्या गाडया रद्द आहेत ते पाहूयात…
 
ठाणे-दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गांशी संबंधित पूर्वीच्या अनावश्यक ठरलेल्या धीम्या मार्गांना सध्याच्या जलद मार्गांशी जोडण्यासाठी आणि क्रॉसओवरची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 23 जानेवारी 2022 (शनि/रवि मध्यरात्री) 01.20 वाजलेपासून ते 23.1.2022 रोजी दुपारी 3.20 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा आणि दिनांक 23.1.2022 (रविवार) रोजी दुपारी 12.30 वाजलेपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर 02 तासांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत दिवा-ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर गाड्या धावतील.
ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर/ लोकमान्य टिळक टर्मिनसहून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन गाड्या डाऊन फास्ट मार्गावरून किंवा 5व्या मार्गावरून ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्र.7 वर येतील आणि नवीन 5व्या मार्गाने (पूर्वीचा डाऊन जलद मार्ग) पारसिक बोगद्यामधून जातील.
 
22 जानेवारी रोजी प्रवास सुरू होणारे एक्सप्रेस गाड्या रद्द
 
17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस
12140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
23 जानेवारी रोजी प्रवास सुरू होणारे एक्सप्रेस गाड्या रद्द
 
22105 / 22106 मुंबई – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस
22119 / 22120 मुंबई – करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस
11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
12071 / 12072 मुंबई – जालना – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
पनवेल येथे थांबणाऱ्या (शॉर्ट टर्मिनेशन) एक्सप्रेस गाड्या
 
16346 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस दिनांक 21.1.2022 रोजी सुटणारी
12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस दिनांक 22.1.2022 रोजी सुटणारी
10112 मडगाव – मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस दिनांक 22.1.2022 रोजी सुटणारी
पनवेलहून सुटणाऱ्या (शॉर्ट ओरिजिनेशन) एक्सप्रेस गाड्या
 
16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस दिनांक 23.1.2022 रोजी सुटणारी
12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस दिनांक 23.1.2022 रोजी सुटणारी
10103 मुंबई – मडगाव मांडवी एक्सप्रेस दिनांक 23.1.2022 रोजी सुटणारी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कवठे महांकाळ निवडणूकः आर आर आबांच्या मुलाने केली कमाल