पुण्यातील कात्रज आंबेगाव परिसरात तब्बल १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त करण्यात आले असून महेंद्रसिंह देवरा या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पूलावरून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आयशर शो रुमच्या जवळ असलेल्या एका इमारतीमध्ये भेसळयुक्त तुप तयार केले जात आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, डालडा आणि जेमिनी तेल एकत्र करून तुप तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले. तिथे अशा प्रकाराचे तब्बल १५० लिटर भेसळयुक्त तुप आढळून आले. यासाठी लागणारे साहित्य देखील होते. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनच्या अधिकार्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते तेथील तुपाचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. तर या प्रकरणी आरोपी महेंद्र सिंह देवरा याच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगितले.