Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार

2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजिटल करणार
नागपूर- डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल करु, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र ङ्खडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात बोलत होते.
 
राज्यात एकूण 29 हजार ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करु, असा विश्वास मुख्यमंर्त्यांनी व्यAत केला आहे. शिवाय, प्रायोगिक तत्वावर राज्यातील काही निवडक ग्रामपंचायतींना ऑप्टिकल ङ्खायबरने जोडून तिथे सरकारच्या सर्व सेवा डिजिटल स्वरूपात पुरवल्या जात आहेत, अशी माहितीही मुख्यमंर्त्यांनी यावेळी दिली.
 
डिसेंबर 2018 पर्यंत संपूर्ण राज्यात डिजिटल सेवांचा विस्तार करू असे मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामपंचायती डिजिटल झाल्यास त्याचा लाभ अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण भागातील सर्व शासकीय सोयींसाठी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा घरपोच मिळाव्यात, यासाठी नागपूर जिल्हा हा 2 ऑक्टोबरपर्यंत डिजीटल जिल्हा करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वतंत्र विदर्भासाठी निवडणुका घ्या : विखे-पाटील