Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुसावळमध्ये भाजप २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भुसावळमध्ये भाजप २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
, शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (21:20 IST)
भुसावळ : भुसावळमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय, कारण भाजपला मोठे खिंडार पडले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भुसावळमधील भाजपच्या नगराध्यक्षांसह २१ नगरसेवक तसेच सावदा ता. रावेर येथील नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह आठ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
 
भुसावळ येथे शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यात हा प्रवेश सोहळा झाला. याशिवाय अनेक ग्रामपंचायत सदस्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे हे नगरसेवक माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिलाय. एकानाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसेंनी आधी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.
 
जळगावतल्या सोन्याची किंमत सर्वांनाच कळत नाही
जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही, असा टोला अजित पवार यांनी यावेळी भाजपला लगावलाय. एकनाथ खडसे यांनी ४० वर्षे भाजपसाठी काम केले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आनंद झाला, आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्या हस्ते विविध मागण्यांचे आणि संघटनेचे एकत्रित निवेदन अजित पवार यांच्याकडे दिले. जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा आपण मार्ग काढू असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असता तर बरं झाले असते, जळगाव जिल्ह्यात आज परिस्थिती वेगळी असती, जळगावात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे, खडसे आधी आले असते तर पूर्ण जिल्हा आपला असता, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नगरमध्ये ओमायक्राॅनचा रुग्ण ? जाणून घ्या सत्य…