Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ashadhi Wari 2022 :आषाढी वारीसाठी आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन

vitthal rukmani
, शुक्रवार, 1 जुलै 2022 (17:05 IST)
आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. 
 
यंदा आषाढी वारीला आपल्या लाडक्या विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने येणार्‍या लाखो भाविकांसाठी आज 1 जुले पासून  विठूरायाचे दर्शन चोवीस तास सुरू करण्यात आले आहे. जेणे करून आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आपल्या लाडक्या विठूमाऊलीचे दर्शन घेता यावे. 
 
वर्षातील सर्वात मोठी आषाढी यात्रा सुरू असून यासाठी विविध दिंडयांमधून लाखो भाविक विठ्ठलनगरीच्या मार्गावर आहेत. यात्रा काळात परंपरेनुसार सुमारे पंधरा दिवस विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू ठेवण्यात येते. विठूमाउली केवळ भक्तांसाठी पंढरीत अवतरलचे मानले जाते. यामुळेच केवळ एका विटेवर तो 28 युगापासून उभा असलल्याची ख्याती आहे. या देवाचे विविध नित्यनेमाने अनेक उपचार असतात. यात पहाटे साडेचार वाजता काकडा आरती, दुपारी अकरा वाजता महानैवेद्य, साडेचार वाजता पोशाख, सायंकाळी सात वाजता धुपारती, रात्री साडेदहा वाजता पाद्यपूजा व रात्री बारा वाजता शेजारती असे राजोपचार दररोज पार पडतात. यावेळी रात्री 12 ते पहाटे 6 दर्शन बंद राहते. मात्र आषाढी व कार्तिकी यात्रेमध्ये वरील सर्व राजोपचार पूर्ण बंद असतात. केवळ पहाटे अभिषेक व नैवेद्य यासाठी काही काळ दर्शन बंद असते. यात्रेत भाविकांसाठी पूर्णवेळ दर्शन सुरू असते. या काळात देव झोपत नाही, असे मानले. आज सकाळी विठ्ठल रखुमाईच्या पलंग बाहेर काढण्यात आला असून यानंतर सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहे देव आता आषाढी यात्रा संपेपर्यंत झोपायला जाणार नाही.अशी प्रथा आहे. विठुरायाचे मुखदर्शन आणि पदस्पर्श याचा लाभ सर्व भाविकांना मिळावा या साठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत.  यामुळे देव भक्तांच्या भेटीसाठी 24 तास असणार आहे. यंदा राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पत्नीसह विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा करणार आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Who is Nupur Sharma कोण आहे नूपुर शर्मा ?