Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे देणार

पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे देणार
, बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (21:48 IST)
मुंबई पालिकेतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे. तसेच, पत्राचाळीतील नागरिकांना 25 हजार भाडे देण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
 
“मुंबई पालिकेतील 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार आहे. 2 वर्षांपूर्वी कुणाच्या आदेशाने हा निर्णय रद्द केला माहिती नाही. पण आम्ही त्यांना मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे” अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना 25 हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
 
याशिवाय, अनेक वर्षे रखडलेल्या गिरणी कामगार घराची लॉटरी तात्काळ काढण्यात येणार आहे. 50 हजार घर गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत स्वस्तात घर मिळण्याचे पोलिसांचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे. पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांपेक्षा कमी किंमतीत घर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे कॅगकडून विशेष ऑडिट होणार