Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री सप्तशृंग देवीशारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी २५ हजार भाविकांनी दर्शन घेतले

Saptashrungi
, सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (22:23 IST)
शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी २५ हजार भाविकांनी दर्शन घेतले तर साडेसात हजार भाविकांनी प्रसादालयात महाप्रसादाचा लाभ घेतला. शारदीय नवरात्रोत्सवात सोमवारी सकाळी ९ वाजता दुर्गाअष्टमी निमित्त देवीच्या सुवर्ण अलंकाराची विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून शेकडोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
 
यावेळी श्री सप्तशृंग देवीची पंचामृत महापूजा ही कॅट (CAT) भारत सरकारचे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचें सन्मानीय न्यायमूर्ती रणजित मोरे व उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी सपत्नीक केली. तसेच श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र, दिंडोरीचे प्रणेते गुरुमाऊली आणासाहेब मोरे व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महानैवेद्य आरती केली.
 
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड चे विश्वरत तथा कळवण तहसीलदार बंडू कापसे, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील व जिल्हा न्यायालय, नाशिक येथील राजशिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासन प्रतिनिधी आदी उपस्थिती होते. अष्टमीच्या दिवशी नियोजित असलेला पालखी सोहळा अर्थात श्री भगवती पालखीची विधिवत पूजन देणगीदार भाविक अॅड श्री अखिलेश नाईक व कुटुंबीय यांनी पूजा करुन नगर प्रदक्षिणा करण्यात आली.
 
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे ७.५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासन प्रतिनिधी, कर्मचारी व पुजारी वर्ग तसेच स्थानिक ग्रामस्थ यांसह जिल्हा प्रशासनाने विविध विभाग विशेष परिश्रम घेत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक –चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून