Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालेगाव दगडफेक प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल

मालेगाव दगडफेक प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल
, शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (15:49 IST)
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या मालेगाव बंदला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या सतर्कतेने काही वेळातच वातावरण निवळले आहे. आज मालेगावातील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे.
कालच्या दगडफेक घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून जमावातील १० हुल्लडबाजांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यांमधून काही संशयितांना अजूनही ताब्यात घेण्याचे सत्र सुरू असून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. मालेगावात सध्या सर्वत्र शांतता असून जनजीवन पूर्वपदावर आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

80 दशलक्ष वर्षांपूर्वी अटलांटिक महासागरात विचित्र प्राणी राहत होते, असे अभ्यासातून समोर आले आहे