राज्य सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेताना महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आता महागाई भत्ता 9 टक्यांवरून 12 टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या कालावधीसाठी वाढीव 3 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
जानेवारी 2019 ते जून 2019 या सहा महिन्यांची वाढीव महागाई भत्त्याची रक्कम जानेवारी 2021 च्या पगारात रोखीने मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार घसघसीत मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.