Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकरी आत्महत्या: सरकार स्थापनेच्या महिन्यात 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकरी आत्महत्या: सरकार स्थापनेच्या महिन्यात 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
, शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (10:48 IST)
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडी घडत असताना जवळपास 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय.
 
नोव्हेंबर 2019 या महिन्यात 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या चार वर्षात प्रथमच असं घडलं. 2015 या वर्षातील काही महिन्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी 300 चा आकडा पार केला होता.
 
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर सुरू असलेल्या सत्तानाट्यादरम्यान राज्यातला शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत होता. जवळपास 70 टक्के खरीप पीक अवकाळी पावसामुळं उद्ध्वस्त झाला.
 
ऑक्टोबर महिन्यात 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. ही संख्या नोव्हेंबरमध्ये 114 नं वाढली.
 
एकट्या मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यात 120 शेतकरी आत्महत्यांची नोंद झालीय, तर विदर्भात 112 घटनांची नोंद झालीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिल्हा परिषद निवडणुकांतली महाविकासआघाडीची मुसंडी भाजपसाठी धोक्याची घंटा आहे का?