येथील देवळाली कॅम्प मध्ये ११६ टीए (टेरिटोरियल आर्मी) पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी सोमवार दि. 29 पासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रासह देशभरातील ९ राज्य व ३ केंद्र शासित प्रदेशातील सुमारे 30 हजार युवक देवळालीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून ३ अधिकारी व ६० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये गेल्या वेळी लष्कराच्या भरतीदरम्यान गोंधळ झाला होता. यात गोंधळात तीन युवक गंभीर जखमी झाले होते. यामुळे यावेळी लष्कराकडून विशेष दक्षता घेण्यात येत आली आहे. १००- १०० युवकांचा समूह आनंद रोड येथे बनवत त्यांना टप्प्याटप्प्याने बसवण्यात आलं आहे. त्यांची कागदपत्रे तपासणी व उंची मोजण्यासाठी आनंद रोड मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे. कागदपत्रे तपासणी व उंचीमध्ये बाद झालेल्या युवकांना इथूनच बाहेर काढण्यात येत आहेत. आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.