हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रीब्युटर शिप मिळवून देण्याच्या बहाण्याने नाशिकच्या विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना राहुल शर्मा असे नाव भासणाऱ्या इसमाने तब्बल 30 लाख 71 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार घडलेला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक २४ जून २०२० पासून २१ ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये फिर्यादी निखिल राजेंद्र राऊत राहणार विंचूर याने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रीब्युटर शिपसाठी आँनलाईन अर्ज भरल्याने त्यात वरिल नंबरवरून राहुल शर्मा नावाचे इसमाने कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवुन फिर्यादी निखिल राऊत याने वेळोवेळी युनियन बैंक आँफ इंडिया शाखा अंधेरी ईस्ट मुबई व पंजाब नैशनल बैंक शाखा अंधेरी ईस्ट मुबई या बँकेच्या बनावट हिदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाचे खातेवर वेगवेगळ्या प्रकारे रक्कम वेगवेगळी कारणे देवुन RTGS द्वारे एकुण रक्कम ३०,७१,५००/-एवढ्या रक्कमेची ऑन लाईन फसवणुक केली.
यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची खोटी वेबसाईट बनवुन डिस्ट्रीब्युटरशिप देतो असे फसवुन फिर्यादीस डिस्ट्रीब्युटरशिपचे कन्फर्मेशन लेटरचे खोटेप्रमाणपत्र देवुन फिर्यादीचा एकूण ३०,७१,५००/-रूपयेची फसवणुक केली.