Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

पोलिसांनी मिरवणुकीला केला मज्जाव, पोलीसांवर हल्ला, ४ पोलीस गंभीर

पोलिसांनी मिरवणुकीला केला मज्जाव, पोलीसांवर हल्ला, ४ पोलीस गंभीर
, मंगळवार, 30 मार्च 2021 (11:46 IST)
नांदेडमध्ये मिरवणूक काढण्यास मज्जाव केल्याच्या रागात ४ पोलिसांवर काही युवकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात ४ पोलीस गंभीर जखमी आहेत. नांदेडमध्ये  लॉकडाऊन असल्याने शीख समाजाच्या होळीनंतर निघणाऱ्या हल्लामोहल्ला मिरवणूक कार्यक्रमाला परवानगी नव्हती. पण पोलीस आणि शीख समुदायाच्या काही महत्त्वाच्या लोकांची चर्चा झाली आणि हा कार्यक्रम थोडक्यात संपवायचा होता. तसेच मर्यादा पाळण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.
 
पण यातील हल्लामोहल्ला मिरवणूक कार्यक्रमातील काही शेकडो तरूणांनी नियमांची पायमल्ली करत बॅरिकेटस तोडले, यावेळी १० पोलीस जखमी झाले आहेत, तर ४ पोलीस गंभीर आहेत. शीख समुदायातील काही ज्येष्ठ मंडळींनी तणाव निवळण्यात मध्यस्थता केली.  हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी न दिल्याने हा राडा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली BJPचे माजी उपाध्यक्ष जीएस बावा यांचे मृतदेह पार्कमध्ये ग्रिलमधून लटकलेला आढळला, आत्महत्येची शंका