Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडले; तापी नदीकाठी सतर्कतेचे आवाहन

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडले; तापी नदीकाठी सतर्कतेचे आवाहन
, शनिवार, 24 जुलै 2021 (08:32 IST)
हतनूरमधून 1 लाख 30 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सकाळी 6 वाजता हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पातील 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 51 हजार 925 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पातील 5 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 75 हजार 56 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. हतनूर क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याचा वाढता येवा लक्षात घेता दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविता येईल. तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिपळुणातील महापूर कोरोनाग्रस्तांच्या जीवावर;व्हेंटिलेटरवरील ८ रुग्णांचा मृत्यू