Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेडमध्ये ४३ लाखांहून अधिक किमतीची ४,७९६ घातक शस्त्रे जप्त

Nanded Rural Police
नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारीविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत तब्बल ४३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत ४,७९६ विविध प्रकारची घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली असून, ही नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी शस्त्रजप्ती मानली जात आहे.
या मध्ये ४७० तलवारी, २०९ खंजर, चाकू, २४ फायटर असे घटक शस्त्रांचा साठा आहे. ज्याची किंमत ४३ लाखांहून अधिक आहे. 
ALSO READ: कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने केली धाकट्या भावाची हत्याALSO READ: कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने केली धाकट्या भावाची हत्या
 जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व त्यांची विक्री करण्याऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होतेपोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वजिराबाद परिसरातील गुरू रामदासनगर येथे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलवारी, खंजीर, कुकरी आणि इतर घातक शस्त्रांचा साठा आढळून आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण शस्त्रसाठा जप्त केला
ALSO READ: अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्याने एकाच कुटुंबातील सात सदस्यांना विषबाधा
या प्रकरणात जसवंतसिंह प्रकाशसिंह सुखमणी आणि अन्य एका संशयिताविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, हा शस्त्रसाठा कोणत्या उद्देशाने जमा करण्यात आला होता आणि त्याचे इतर राज्यांशी काही संबंध आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश