Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Red Alert in 7Areas राज्यावर ४८ तास अस्मानी संकट, ७ भागांना रेड अलर्ट

Red Alert in 7Areas राज्यावर ४८ तास अस्मानी संकट, ७ भागांना रेड अलर्ट
मुंबई , शुक्रवार, 21 जुलै 2023 (22:09 IST)
Red Alert in 7Areasराज्यात गेल्या ३-४ दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून अनेक शहरांना पुराचा धोका आहे.
 
अशात राज्यात पुढच्या काही दिवस हा पाऊस असाच राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला पुढच्या ४८ तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज नक्की घ्या.
हे ही वाचा:  तृतीयपंथीयांचा व स्त्रियांचा वेश घेऊन महामार्गावर गाड्या लुटणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद !
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्र राज्यात पुन्हा जोमाने सक्रिय होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि अगदी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
कोकण आणि पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या भागांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मुंबई आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यानं अंधेरीत पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. हवामान विभागानं आज मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
नागरिकांना सूचना…:
सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांनी अति महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावं. घाट माथ्यावर फिरण्यासाठी जाणं टाळा. सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे रुळ/ बस मार्ग या ठिकाणी जाणे टाळा. डोंगराळ भागांत किंवा घाट माथ्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशा सूचना हवामान विभाग आणि प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Heavy rains in Mumbai मुंबईत मुसळधार : रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूक उशिराने