सोलापुरात उभ्या ट्र्क ला कार धडकून झालेल्या अपघातात लहान मुलांसह पाच जणांच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिरज येथील जाधव आणि शितोळे कुटुंबीय देवदर्शनाला निघाले असता सोलापूर बाजार समिती जवळ हा अपघात झाला. मिरज येथे राहणारे जाधव कुटुंब आपले नातेवाईक शितोळे कुटुंबासह मिरज येथून गोंदवलेनंतर अक्कलकोटचे दर्शन करून तुळजापूरसाठी कारने निघाले होते. दुपारी सोलापूर-हैदराबाद मार्गावर बाजार समिती जवळ एक उभारलेल्या ट्रकला त्यांची कार जाऊन धडकली. कार अर्ध्याहून जास्त ट्रकच्या खाली गेली.या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले.
सचिन अण्णासाहेब शितोळे(35), दिलीप जाधव (37),सोनबाई जाधव (55), गौरी दिलीप जाधव (5), लाडू दिलीप जाधव(3) हे मृत झाले. तर ईशा दिलीप जाधव, विनायक घोरपडे, वर्षा सचिन शितोळे, रेखा दिलीप जाधव हे जखमी झाले आहे.
अडकलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली. या अपघातात जखमींना रुग्णालयात दाखल केले असता दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी वाहतूक शाखा आणि पोलीस पोहोचून मदतकार्य सुरु केले आणि मृतांना बाहेर काढण्यात आले असून त्यात लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची नोंद करण्यात आली आहे.