Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

नगर-कल्याण महामार्गावर तीन वाहनांमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी
, बुधवार, 24 जानेवारी 2024 (12:35 IST)
अहमदनगर जिल्ह्यात एका भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर तीन वाहनांची एकत्रत धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.
 
बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर ढवळपुरी फाट्या जवळ पहाटेच्या सुमारास उस वाहतुक करणारा ट्रक्टर व एसटी बस आणि इको गाडी यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लगेच जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरु असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमींना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
 
या अपघातामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज जरांगे : मातोरी ते मुंबई व्हाया अंतरवाली सराटी, वर्षभरापर्यंत माहीत नसलेला हा नेता कोण आहे?