Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संतापजनक : ६२ वर्षाच्या वृद्धाचे कुकर्म, एका चिमुकलीवर अत्याचार, दुसरीसोबत अश्लील चाळे, नराधम वृद्ध गजाआड

संतापजनक : ६२ वर्षाच्या वृद्धाचे कुकर्म, एका चिमुकलीवर अत्याचार, दुसरीसोबत अश्लील चाळे, नराधम वृद्ध गजाआड
, मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (08:23 IST)
जळगावच्या धरणगावात आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना  उघडीस आली आहे. चंदुलाल शिवराम मराठे ( वय ६२) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. दरम्यान, एका चिमुकलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
सविस्तर वृत्त असे की, धरणगावातील एका परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. उशीर झाला तरी मुली घरी न आल्यामुळे आई त्यांना घेण्यासाठी परत आली. त्यावेळी चंदुलाल मराठे याने दोन्ही मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले. गरीब कुटुंबातील आई हा प्रकार पाहून हादरून गेली होती.
 
दरम्यान, सहा वर्षाच्या बालिकेने चक्कीवाल्या बाबाने आपल्यालाही मांडीवर बसवले असे सांगताच आई हादरली. कामावर गेलेला नवरा घरी परतताच तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. पतीसह दोघी मुलींना घेऊन या महिलेने सायंकाळी पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून उशिरा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या सहा वर्ष वयाच्या पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला. पुढील तपासणीसाठी या बालिकेला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिवराम मराठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान चंदुलाल मराठेचा मुलगा भूषण मराठे याने पोलीस स्टेशन मध्येच पीडितेच्या आईला धमकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिलासा, मुंबईत दोन वर्षांत पहिल्यांदाच कोरोना रूग्णांची संख्या शंभराच्या खाली