राज्यात रविवारी 66 हजार 191 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 61 हजार 450 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 35 लाख 30 हजार 060 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट 82.19 टक्के एवढा झाला आहे.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42 लाख 95 हजार 027 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 6 लाख 98 हजार 354 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 82 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 64 हजार 760 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.51 टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात 42 लाख 36 हजार 825 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 29 हजार 966 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 57 लाख 49 हजार 543 नमूने तपासण्यात आले आहेत.