Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मध्य रेल्वे कडून आषाढी एकादशी निमित्त 76 विशेष गाड्या

मध्य रेल्वे कडून आषाढी एकादशी निमित्त 76 विशेष गाड्या
, रविवार, 18 जून 2023 (17:32 IST)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी बंधू आणि भाविक पंढरपूरला जातात. भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने पंढरपूर आषाढी वारी साठी 76 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर ,अमरावती खामगाव येथून वारीसाठी गाड्या सुटतील. पंढरपूर-भुसावळ, पंढरपूर- लातूर, मिरज- पंढरपूर, मिरज -कुर्डुवाडी अशा विशेष गाड्या पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने चालवणार आहे. जेणे करून भाविकांना दर्शनासाठी गैरसोय होऊ नये. 
 
नागपूर- पंढरपूर येथून 
गाडी क्रमांक 01207 स्पेशल नागपूरहून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01208 विशेष पंढरपूर येथून 27.06.2023 आणि 30.06.2023 (2 सेवा) रोजी 17.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी
संरचना : एक द्रुतीये वातानुकूलित , दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 7 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
 
नागपूर-मिरज स्पेशल (4 सेवा)
गाडी क्रमांक 01205 विशेष गाडी 25.06.2023 आणि 28.06.2023 (2 सेवा) रोजी 08.50 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता मिरजला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01206 विशेष मिरज येथून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 12.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे.
संरचना : दोन तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, 9 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
 
नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01119 विशेष नवीन अमरावती येथून 25.06.2023 आणि 28.06.2023 (2 सेवा) रोजी 14.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 09.10 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01120 विशेष पंढरपूर येथून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 19.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.40 वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल.
थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी
संरचना : एक द्रुतीये वातानुकूलित ,दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 7 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
 
भुसावळ-पंढरपूर विशेष (2 सेवा)
01159 विशेष गाडी 28.06.2023 रोजी भुसावळहून 13.30 वाजता सुटेल आणि दुसर्याू दिवशी 03.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
01160 स्पेशल पंढरपूर येथून 29.06.2023 रोजी 22.30 वाजता सुटेल आणि दुसर्यार दिवशी 13.00 वाजता भुसावळला पोहोचेल.
थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा.
संरचना : 8 शयनयान, 6 जनरल सिटिंग, 9 जनरल सेकंड क्लाससह 1 लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन 
 
खामगाव-पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 11.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01122 विशेष पंढरपूर येथून 27.06.2023 आणि 30.06.2023 (2 सेवा) रोजी 05.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.30 वाजता खामगावला पोहोचेल.
थांबे : जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी
संरचना : एक द्रुतीये वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, 6 शयनयान, 12 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
 
 
लातूर-पंढरपूर (08 सेवा)
गाडी क्रमांक 01101 आषाढी विशेष 23.06/27.06/28.06 आणि 30.06.2023 (4 सेवा) रोजी लातूरला 07.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.25 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01102 आषाढी विशेष पंढरपूर येथून 23.06/27.06/28.06 आणि 30.06.2023 (4 सेवा) रोजी 13.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.20 वाजता लातूरला पोहोचेल.
थांबे : हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्सी टाऊन, शेंद्री, कुर्डूवाडी आणि मोडलिंब.
संरचना : 8 शयनयान , 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी
 
 मिरज-पंढरपूर अनारक्षित विशेष (10 सेवा)
गाडी क्रमांक 01147 विशेष पंढरपूर येथून 24.06/26.06/27.06/01.07 आणि 03.07.2023 रोजी 09.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.15 वाजता मिरजला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01148 विशेष गाडी मिरजहून 24.06/26.06/27.06/01.07 आणि 03.07.2023 रोजी 16.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.20 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
थांबे : सांगोला, वासूद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जठ रोड, धालगाव, लंगर पेठ, कवठेमहांकाळ, सुलगरे, बेळंकी आणि आरग
संरचना : एक द्रुतीये वातानुकूलित कम तृतीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, 6 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह
 
 मिरज-पंढरपूर अनारक्षित विशेष (20 सेवा)
गाडी क्रमांक 01107 अनारक्षित विशेष 24.06 पासून मिरजहून 05.00 वाजता सुटेल. 2023 ते 03.07.2023 (10 सेवा) आणि त्याच दिवशी 07.40 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01108 अनारक्षित विशेष पंढरपूर 24.06.2023 ते 03.07.2023 (10 सेवा) दरम्यान 09.50 वाजता पंढरपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी 13.50 वाजता मिरजला पोहोचेल.
थांबे : आरग, बेळंकी, सुलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, धालगाव, जठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळा, वासूद आणि सांगोला
संरचना : 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 14 सामान्य द्वितीय श्रेणी
 
 मिरज-कुर्डूवाडी पूर्णपणे अनारक्षित विशेष (20 सेवा)
गाडी क्रमांक 01209 अनारक्षित विशेष मिरज 24.06.2023 ते 03.07.2023 (10 सेवा) दरम्यान 15.10 वाजता मिरजहून सुटेल आणि त्याच दिवशी 18.50 वाजता कुर्डुवाडीला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01210 अनारक्षित विशेष कुर्डुवाडी 24.06.2023 ते 03.07.2023 (10 सेवा) दरम्यान 19.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.45 वाजता मिरजला पोहोचेल.
थांबे : आरग, बेळंकी, सुलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, धालगाव, जठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळा, वासूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब.
संरचना : 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 14 सामान्य द्वितीय श्रेणी
 
 
पंढरपूर आषाढी एकादशी विशेष गाड्या भाविकांसाठी मध्य रेल्वे कडून चालवल्या जाणार आहे. तपशीलवार माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES App डाउनलोड करा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
 
Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hingoli : भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकांचा मृत्यू