Publish Date: Mon, 27 Jun 2022 (20:41 IST)
Updated Date: Sun, 16 Oct 2022 (19:45 IST)
खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून म्हैसाळ येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या दोन पत्रांमध्ये वनमोरे बंधूंनी कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या 25 खासगी सावकारांची नावे लिहिली आहेत. पोलिसांनी सर्व 25 सावकारांवर गुन्हा दाखल केला असून 18 जणांना अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके जिल्हा आणि कर्नाटकात पाठवण्यात आली आहेत.
मात्र, या प्रकरणाने दुसरे वळण घेतले. तपासात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. वनमोरे कुटुंबीयांची हत्या अन्नातून विष प्राशन करून झाल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.