Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

दिल्लीमध्ये होणार 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

98th All India Marathi Literature Conference
, बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (14:33 IST)
आगामी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होणार आहे. या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार का हे पाहावे लागणार आहे. 
 
यंदा आगामी साहित्य संमेलनासाठी 7 ठिकाणांहून निमंत्रण प्राप्त झाली असून साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात बैठक झाली त्यात आगामी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याचा निर्णय घेण्यात आला. 
यंदा सात दशकांनंतर राजधानी दिल्ली येथे साहित्य संमेलन होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या पूर्वी 1954 मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले होते. यंदा या वर्षी मराठी साहित्य संमेलन दिल्लीला होणार असे निर्णय घेण्यात आले आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या साहित्य संमेलनात दिग्गज साहित्यिकांसह नवोदित लेखक देखील कार्यक्रमाचा भाग असतील. 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे वैशिष्टय आहे.यंदा या संमेलनासाठी 7 ठिकाणाहून निमंत्रणे प्राप्त झाली मात्र यंदाचे संमेलन दिल्लीत व्हावे या साठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते.
 
यंदा दिल्लीत हे संमेलन सरहद या संस्थेने दिल्ली मराठी प्रतिष्ठान व दिल्लीतील अन्य मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने प्रस्ताव मांडला असून दिल्लीत संमेलन होण्यासाठी विनंती केली.की यंदा स्थळ निवड समिती तर्फे दिल्लीत संमेलन घेण्याची संधी द्यावी.त्यानंतर हे संमेलन दिल्लीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार का हे पाहणे जात आहे.
शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार असून या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, संमेलनाचेअध्यक्ष डॉ. तारा भवाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. 

संमेलनाचा समारोप रविवार 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडपात होणार असून या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ पिंपरीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील या वेळी उपस्थित राहणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाराष्ट्र सरकारमधील फुटीबद्दल एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले